डिव्हायडरला धडकून स्कोडा कार उलटली

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : चिंचवड कडून पिंपरीकडे जात असताना डिव्हायडरला धडकून स्कोडा कार पलटी झाली. ही घटना आज (सोमवारी, दि. ४) दुपारी दोन वाजताच्या सुमारास लिंक रोडवर दर्शन हॉल जवळ घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेश पैसे हे कार चालवत चिंचवड कडून पिंपरीच्या दिशेने लिंकरोडने जात होते. दर्शन हॉल जवळ आल्यानंतर कार डिव्हायडरला धडकली आणि पलटी झाली. सुदैवाने या घटनेत उमेश यांना कोणतीच दुखापत झाली नाही.

घटनेची माहिती मिळताच श्रीधरनगर बिट मार्शल घटनास्थळी रवाना झाले. पोलिसांनी कार चालक उमेश पैसे यांना मदत करत गाडी बाजूला केली. दरम्यान झालेली वाहतूक कोंडी पोलिसांनी सुरळीत केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here