बाजार सावंगी ( प्रतिनिधी मुनीर शहा ) खुलताबाद पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बाजार सावंगी येथील पोलीस चौकी असून अडचण नसून खोळंबा अशी गत या पोलीस चौकी ची झाली आहे. या पोलिस चौकीत नेहमी एकही पोलिस कर्मचारी या पोलिस चौकीत थांबत नाही यातील काही महाशय कर्मचारी तर येऊन तर यातील काही कर्मचारी औरंगाबाद येथून अप डाउन करतात तर काही नुस्तीच हजेरी लावून निघून जातात यामुळे तक्रारदारांना आपली तक्रार कुणाकडे नोंदवावी असा मोठा प्रश्न पडला आहे.
या पोलीस चौकीशी अंतर्गत तीस ते पस्तीस खेड्यांचा संपर्क येत असल्याने तक्रारदारांना हेलपाटे मारण्याची व पायपीट करण्याची वेळ आली आहे बाजार सांगवी पोलीस चौकी चे नाव बदलून रामभरोसे चौकी ठेवण्यात यावे अशी मागणी नागरिकांतून होत आहे. व या पोलीस चौकीत( थंब अटेंडंट )मशीनही लावण्यात यावा सीसीटीव्ही कॅमेरे ही लावण्यात यावे यामुळे न थांबणाऱ्या कर्मचाऱ्यांना चांगलाच चपराक बसेल व येथील साहेब येण्याची तासनतास वाट पहावी लागत आहे फोन वरुन संपर्क केला बोलाचीच भात आणि बोलायचीच कढी निव्वळ वेळकाढू पणा उडवाउडवीची उत्तरे मिळतात येथील पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्याविरुद्ध पोलीस अधीक्षक ग्रामीण मोक्षदा पाटील साहेबांनी चौकशी करून बाजार सावंगी येथील पोलिस चौकीत नेहमी गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यावर अधिकाऱ्यावर खाजगी पोलीस झिरो पोलीस सफाई कामगार यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी गावातील व परिसरातील नागरिकांतून होत आहे






