अक्कलकोट युवक काँग्रेस कडुन लखीमपुर मध्ये भाजपा केंद्रीय गृहराज्यमंत्री पुत्राने शेतकऱ्यांचे चिरडुन हत्या केल्यामुळे उत्तर प्रदेश सरकार व भाजपाचा निषेध.

अक्कलकोट :(तालुका क्राईम रिपोर्टर वैदपाशा तडमुड)- उत्तरप्रदेश येथे नुकतेच झालेल्या आंदोलक शेतक-यांना वाहनाद्वारे चिरडून भाजपा च्या मंत्री पुत्राने हत्या केल्याच्या निषेधार्थ व काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांच्याशी उत्तरप्रदेश पोलिसांनी केलेल्या बेजाबदार वर्तनाविरोधात आज अक्कलकोट येथील तहसीलदार मा बाळासाहेब शिरसाट यांना अक्कलकोट युवक काँग्रेस वतीने दुधनी कृ ऊ बा सभापती प्रथमेश म्हेत्रे,यांच्या नेतृत्वाखाली तर अक्कलकोट पं समिती सभापती आनंदराव सोनकाबंळे यांच्या अध्यक्षतेखाली युवक काँग्रेस अध्यक्ष बाबासाहेब पाटील,नगरसेवक
सद्दाम शेरीकर,नगरसेवक विकास मोरे यांच्या उपस्थितीत संबधीत गुन्हेगारवर तत्काळ कारवाई करावे व काँग्रेसच्या नेत्या प्रीयंका गांधी यांना अटक करून गैरवर्तन केलेल्या संबधीत आधिकारीवर निलबंनाचे कारवाई करा म्हणुन निषेध व निवेदन देण्यात आले.

यावेळेस शहर युवक अध्यक्ष मुबारक कोरबु,बसवराज अलोळी, शिवशरण ईचगे,अयाज चंदनवाले,राहुल मोरे,अभिजीत अडवितोटे,फारूख बबरची,संदिप नवले,सुनिल ईसापुरे,महादेव करमल,महादेव चुंगी,गुरू म्हेत्रे,राहुल भकरे,सिद्धु म्हेत्रे, उपस्थित होते.

अक्कलकोट10अक्कलकोट

या काँग्रेस पक्षाच्या आंदोलनात यावेळी उत्तर प्रदेशातील भाजपा सरकार व केंद्रीतील मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

या प्रसंगी सुरूवातीला या घटनेत मृत्यू मुखी पडलेल्या आंदोलक शेतकरी बांधवांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here