अंतराळात होणार चित्रपटाचे चित्रीकरण, सायलेन्स….लाइट… कॅमेरा… ॲण्ड ॲक्शन….

मॉस्को (रशिया) : रशियन अभिनेत्री युलिया पेरेसिल्द आणि चित्रपट दिग्दर्शक क्लिम शिपेन्को अंतराळ सफरीवर रवाना झाले आहेत. रशियाच्या सोयुझ अंतराळ यानातून अभिनेत्री युलिया आणि दिग्दर्शक शिपेन्को आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे रवाना झाले. त्यांच्यासोबत तीनदा अंतराळ सफर करणारे अंतराळवीर ॲन्तॉन शकाप्लेरोव्ह आहेत. सोयुझ-एमएस-१९ बैकानूर येथील अंतराळयान प्रक्षेपणतळावरून दुपारी १.५५ वाजता अंतराळ स्थानकाकडे झेपावत कक्षेत पोहोचले. अभिनेत्री आणि दिग्दर्शकासह त्यांच्यासोबतचे सर्व अंतराळ सहप्रवासी आनंदी असून, यानाची सर्व कार्यप्रणाली व्यवस्थित आहे, असे अंतराळ अधिकाऱ्यांनी सांगितले.

अंतराळात चित्रीकरण ही आव्हानात्मक मोहीम आहे. अभिनेत्री युलिया आणि दिग्दर्शक शकाप्लेरोव्ह ‘चॅलेंज’ असे शीर्षक असलेल्या नवीन चित्रपटाचा एक भाग तेथे चित्रित करणार आहेत. या चित्रपटात डॉक्टरची भूमिका करणारी अभिनेत्री युलिया पेरेसिल्द हृदयविकाराने आजारी असलेलेल्या एका अंतराळवीराला वाचविण्यासाठी थेट अंतराळ स्थानकाकडे रवाना होते. तब्बल १२ दिवस चित्रीकरणासाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर मुक्काम करून हे पथक दुसऱ्या एका रशियन अंतराळवीरासोबत पृथ्वीकडे परतणार आहे.

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे प्रयाण करण्यापूर्वी सोमवारी पत्रकार परिषदेत बोलताना अभिनेत्री युलिया पेरेसिल्द म्हणाल्या की, अंतराळ सफरीसाठी प्रशिक्षण घेताना शिस्त आणि कठीण प्रशिक्षण यात ताळमेळ बसविणे माझ्यासाठी आव्हानात्मक होते. प्रशिक्षण मानसिक, शारीरिक आणि सर्वच दृष्टीने कठीण होते. एकदा का आम्ही लक्ष्य साध्य केले, तर सर्वकाही कठीण वाटणार नाही आणि सुखद अनुभवासह चेहऱ्यावरील स्मित लकेरीसह हा क्षण आठवणीत राहील. दिग्दर्शक शिपेन्को यांनीही चार महिन्यांचा प्रशिक्षण काळ कठीण होता, असे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here