नवी दिल्ली (उपसंपादक जीवन षाकया) : रेल्वे मंत्रालयाने बुधवारी देशभरातील रेल्वे कर्मचाऱ्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. भारतातील रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसाचा दिवाळी सणासाठी बोनस रेल्वे मंत्रालयाने बुधवारी जाहीर केला.
या बोनसचा लाभ ११ लाख ५६ हजार रेल्वे कर्मचाऱ्यांना होणार आहे. या बोनसची रक्कम दसऱ्यापूर्वी प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या खात्यावर ऑनलाईन जमा होईल अशीही माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदात साजरी होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.






