जळगावातील जवानाचे काश्मीरमध्ये निधन

जळगाव (क्राइम रिपोर्टर भावेश ठाकूर) : जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात असलेल्या पातोंडा येथील जवान गणेश भीमराव सोनवणे (वय ३६) हे सध्या जम्मू काश्मीर मधील सांबा येथे सेवेत कार्यरत असताना त्याचे मंगळवारी सायंकाळी आकस्मिक निधन झाले. गणेश यांच्या निधनाची माहीती मिळताच त्यांच्या कुटुंबांसह पातोंडा गावावर शोककळा पसरली आहे. आज गुरुवारी त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.

गणेश सोनवणे हे १४ मराठा बटालियन मध्ये सेवेत होते. त्याची आतापर्यंत १६ वर्ष ९ महीने सेवा झाली होती. ते येत्या डिसेंबर महिन्यात १७ वर्ष सेवा पूर्ण करून निवृत्त होणार होते. मात्र, त्यापू्र्वीच दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला. वयाच्या वीसाव्या वर्षी गणेश सोनवणे देशसेवेत दाखल झाले होते. त्यांचे पार्थिव लष्कराचे सर्व शासकीय सोपस्कार पूर्ण करून विमानाने मुंबई येथे येणार आहे. मुंबईहून रुग्णवाहिकेने युनिटच्या सैनिक निगराणीत पार्थिव पातोंडा येथे आणले जाईल. यासाठी त्यांची पत्नी सीमा यांनी लष्कराच्या अधिकाऱ्यांना होकार दिला आहे.

गणेश सोनवणे यांच्या पार्थिवावर आज गुरुवारी (दि.७) रोजी पातोंडा येथेच सर्व शासकीय इतमामात अंत्यसस्कार होणार आहेत. गणेश सोनवणे यांच्या पश्चात आई, पत्नी सीमा, दोन मुली प्रांजल (वय १२) व पिऊ (वय ९) असा परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here