क्वेटा (पाकिस्तान) : पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात गुरुवारी पहाटे भूकंपाचे जोरदार धक्के बसले असून यात किमान १५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. अधिकाऱ्यांनी एएफपी वृत्तसंस्थेला या संदर्भात माहिती दिली आहे.
याबाबत समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ५.७ होती. भूकंपामुळं झालेल्या मृतांच्या आकड्यामध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याचं आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
भूकंपाचे धक्के जाणवायला लागल्यानंतर क्वेटा शहरातील लोक घराबाहेर पडून रस्त्यावर आल्याचे फोटो सोशल सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.






