शिर्डीत फुलांची उधळण, दिव्यांची रोषणाई ; रांगोळ्या घालून शिर्डीत साईभक्तांचे स्वागत

शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) : शिर्डी साईबाबांचा श्रद्धेचा दरबार अनेक महिन्यांच्या सबुरीनंतर गुरुवार सकाळपासून सुरू झाला आहे. भाविकांच्या स्वागतासाठी साईंची नगरी सज्ज झाली असून, साई संस्थानानेही जय्यत तयारी केली आहे. साई समाधी मंदिरासह चावडी, द्वारकामाई तसेच गुरूस्थान मंदिराला उत्सवाप्रमाणे आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. तर, प्रवेशद्वारावर झेंडूच्या फुलांचे तोरण उभारण्यात आले आहे.

कोरोनाच्या संकटात राज्यातील सर्व धार्मिक स्थळे बंद होती. राज्य शासनाच्या आदेशानंतर सर्व धार्मिक स्थळे खुली होत असून, भाविकांना कोरोना नियमावलीचे पालन करत दर्शन घ्यावे लागणार आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणारे शिर्डीतील साईंचे मंदिर खुले होत असल्याने ग्रामस्थ आणि व्यावसायिकांमध्ये कमालीचा उत्साह दिसून येत आहे. मंदिर बंद असल्याने शिर्डीचे अर्थकारण ठप्प झाले होते. आता मंदिर सुरू होत असल्याने सर्वांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शिर्डी नगरपंचायतीने ग्रामस्थ तसेच व्यावसायिकांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबवली असून, ९० टक्के ग्रामस्थांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. लसीकरणासाठी इच्छुक असणाऱया भाविकांसाठीही साई मंदिर परिसरात प्रायोगिक तत्त्वावर लसीकरण मोहीम राबवणार असल्याचे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here