सिद्धिविनायक मंदिरांचं भक्तांसाठी दार खुलं; दर तासाला २५० भक्तांना देणार क्यूआर कोड

मुंबई (प्रतिनिधी चेतन किर्दत) : तब्बल दीड वर्षानंतर अखेर महाराष्ट्रातील मंदिराचे दरवाजे उघडे करण्यात आले आहेत. आजपासून राज्यातल्या जनतेला मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घेता येणारेय. राज्य सरकारने कोरोनाचे सर्व नियम पाळून घटस्थापनच्या मूहूर्तावर म्हणजेच आज नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी राज्यातील सर्व मंदिरं खुले करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आज पहाटेच राज्यातील सर्व प्रसिद्ध मंदिरांची दारं भाविकांसाठी खुली झाली आहेत.

मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर, महालक्ष्मी मंदिर, मुंबादेवी मंदिर सकाळी उघडण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पार्थ पवार आणि जयंत पाटील, सुनिल केदारे यांनी आज सिध्दीविनायक मंदिरात जाऊन गणपतीचं दर्शन घेतले.


मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिराचे दरवाजे उघडले असले तरी, यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे देखील जारी करण्यात आली आहेत.श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टच्या अॅपवर भक्तांना प्री-बुकिंग क्यूआर कोडद्वारेच गणपतीच्या दर्शनासाठी परवानगी दिली जाणार आहे. दर तासाला फक्त २५० यात्रेकरूंना क्यूआर कोड दिला जाईल. मुंबई पालिका क्षेत्रांतील सर्व धार्मिक स्थळांमध्ये उपस्थितांची संख्या ही त्या धार्मिक स्थळाच्या क्षमतेच्या ५० टक्क्यांपर्यंत मर्यादित असेल.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here