श्रीनगरमध्ये शाळेत दहशतवादी हल्ला, महिला प्राचार्यासह शिक्षकाचा मृत्यू

श्रीनगर (ऑल इंडिया उपसंपादक राजन चौधरी) : येथे दोन शिक्षकांची गोळीबार करून हत्या करण्यात आली आहे. इदगाह येथील गव्हरमेंट बाईज हायर सेंकडरी स्कूलमध्ये ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, संशयित अतिरेक्यांनी शाळेच्या आवारात त्यांच्यावर गोळीबार केला. मृतांमध्ये एका महिलेचा समावेश आहे, ती शाळेची प्राचार्य असून सुपिंदर कौर असे त्यांचे नाव आहे, तर इतर मृत व्यक्तीचे नाव दीपक चंद असे आहे. सुरक्षा रक्षकांनी परिसराला घेराव घातला आहे.

हे हल्ले काश्मिरी मुस्लिमांना बदनाम करण्याचे षडयंत्र आहे आणि ते पाकिस्तानमधील एजन्सींच्या सूचनेनुसार केले जात आहेत, अशी प्रतिक्रिया जम्मू आणि काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here