शेतीमालाची देशांतर्गत ने आण करण्याकरिता , विशेषतः नाशिक जिल्ह्यातील कांदा ,द्राक्ष , जळगाव जिल्ह्यातील केळी , टोमॅटो ,वइतर भाजिपाला पोहच करने साठी रेल्वे डब्याची मागणी सातत्याने होत होती , याबाबतीत खा ,भारती पवार यांनी विशेष प्रयत्न करून खास शेतिमाल ने आन करने करीता नाशिक हुन किसान रेल्वे ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना नक्किच फायदा होईल.
– कुबेर जाधव, समन्नवयक स्वाभिमानि शेतकरी संघटना नाशिक
नाशिक (कुबेर जाधव) – भारत हा कृषिप्रधान देश असून देशाची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने शेतीवरच अवलंबून आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी का केंद्रबिंदू मानत देशाच्या अर्थसंकल्पात शेतकरी वर्गासाठी भरीव निधीची तरतूद केली असून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना लवकरच टप्प्याटप्याने कार्यान्वित होणार आहे. याचाच परिपाक म्हणून शुक्रवारी 7 तारखेला सकाळी साडे 10 वाजता ऑनलाईन उद्घाटन होणार असून शेतकऱ्यांसाठी किसान रेल्वे धावणार आहे.
या रेल्वेमुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाची वाहतूक अधिक जलद होणार असून नाशवंत माल लवकरात लवकर देशाच्या मुख्य बाजारपेठेत विकता येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कायमच शेतकऱ्यांच्या पाठीशी राहिले असून भविष्यातही शेतकरी आणि शेतकरी हिताचेच निर्णय घेण्यास कटिबद्ध आहेत. केंद्रीय रेल्वे मंत्री पियुषजी गोयल हे किसान रेल्वे ला हिरवा झेंडा दाखवून सुरवात करणार आहे. मार्च मध्ये जाहीर झालेल्या देशाच्या अर्थसंकल्पात किसान रेल्वे साठी भरीव निधी उपलब्ध केला होता .त्याचाच परिपाक म्हणून आज किसान रेल्वे धावणार आहे.ह्या आधी पण केंद्र सरकारने हॉर्टिकल्चर ट्रेन, कांदा निर्यात सुलभ व जलद व्हावी म्हणून रेल्वे वॅगन वेळोवेळी उपलब्ध करून दिली आहे.
व्हिडीओ कॉंफेरन्सिंगद्वारे हा कार्यक्रम होणार असून दिल्लीच्या रेल्वे कार्यालयातूनच किसान रेल्वेला हिरवा सिग्नल ऑनलाईन च्या माध्यमातून दाखवणार असल्याचे खा डॉ भारती पवारांनी सांगितले आहे. नासिक जिल्हा हा शेतीप्रधान जिल्हा असून इथे कांदा, द्राक्ष, डाळींब, भाजीपाला यांचे मोठ्या प्रमाणावर उत्पन्न घेत असल्याने याचा मोठा फायदा नासिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणारअसून त्याकरता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय रेल्वे मंत्री पियुषजी गोयल ,कृषिमंत्री नरेंद्रजी तोमर यांचे खा.डॉ.भारती पवार यांनी आभार मानले.







