बुलंद पोलीस टाइम्स्च्या बातमीचा दणका : मुजोर ठेकेदाराची पत्रकारांना विकत घेण्याची भाषा
शहादा (विजय निकम) – येथील नगर पालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक 6 मधील सर्वे नंबर ७९ या नवीन वसाहतीत खासदार निधीतून करण्यात आलेले 450 मी. रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झालेले असून याविषयीची बातमी बुलंद पोलीस टाइम्स्च्या वेबसाईटवरून प्रसारित केली होतीपरंतु सदर रस्त्याचे काम नित्कृष्ट असले तरी या कामाची कोणीही चौकशी करणार नाही असे उत्तर ठेकेदाराकडून प्रसारमाध्यमांना देण्यात येत आहे. वर ही बातमी इतर वृत्तपत्रांना फोटोसह लावा, मी तुम्हांला पैसे देतो, अशी पत्रकारांना विकत घेण्याची मुजोर भाषादेखील या ठेकेदाराकडून करण्यात येत आहे.

ठेकेदार पूर्णपणे उन्मत्त झाला असून त्याला कोणाचा वरदहस्त आहे याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.जोपर्यंत या कामाची पूर्ण
चौकशी होत नाही तोपर्यंत सदर ठेकेदाराची कुठलेही प्रकारचे बिल अदा करण्यात येऊ नये अशी मागणी या परिसरातील जनतेकडून करण्यात येत आहे.याबाबत संबंधित विभागातील इंजिनियर यांच्याशी अनेक वेळा संपर्क साधला असता त्यांनी फोन घेण्याची तसदी घेतली नाही.यातून ठेकेदाराने सर्वांना आपल्या खिशात घातले आहे ही बाब लक्षात येत आहे.
अधिकारी आणि ठेकेदार यांचे काहीतरी आर्थिक साटेलोटे असल्यामुळे सर्वसामान्य जनतेला हालअपेष्टा सहन कराव्या लागतात.खासदार निधीतून झालेल्या रस्त्याचे निर्माण अतिशय निकृष्ट दर्जाचे असून खडी व मुरुम थातूरमातूर पसरवण्यात आले आहे. सदर रस्त्याचे काम सुरू असताना सार्वजनिक बांधकाम विभाग इंजिनिअर यांनी साधे ढुंकूनही पाहिले नाही त्यामुळे रस्त्याचे काम केवळ कामचलावू असल्याचे समोर येत आहे. केवळ खासदार निधीचा पैसा कसा लाटता येईल यासाठी प्रयत्न झालेले दिसून येत आहेत. हे काम खासदार निधीतून पूर्ण करण्यात आल्यामुळे आता खासदार हिनाताई गावित या प्रश्नी लक्ष घालून काय कार्यवाही करतात याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. ऐन पावसाळ्याच्या काळात जनतेचे हाल अपेष्टा होऊ नये यासाठी जनता न्यायाची अपेक्षा करत असून, संबंधितांनी या प्रकरणी लक्ष घालून, या मुजोर ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.








