पैशाचा पाऊस पाडण्याच्या हव्यासापोटी गावाच्या सरपंचाने केली वाघाच्या बछड्याची शिकार

नागपूर (प्रतिनिधी) : अंधश्रद्धेपायी पैश्याचे पाऊस पाडण्यासाठी वाघाच्या बछड्याची शिकार केल्याची घटना नागपूर जिल्ह्यातील बुट्टीबोरी वन परिक्षेत्राच्या हद्दीत घडली आहे. या बछड्याच्या मृत अवयवांची विक्री करताना दोघेजण वनविभागाच्या हाती लागले आहे. यात मुख्य आरोपी त्या गावाचा सरपंच असून लोमेश दाबले असे त्याचे नाव आहे. कालिदास रायपूर हा त्याचा सहकारी असून दोघेही चंद्रपूर जिल्ह्यातील चिंचबोडी गावाचे रहिवाशी आहेत. वन अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडून मृत बछड्याचे अवयव जप्त करत पुढील तपास सुरु केला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्याच्या चिंचबोडी गावाचे सरपंच असलेल्या लोमेश दाबले याचे जंगल परिसरात लागून शेत आहे. वाघ, कासव, यासारख्या वन्यप्राण्यांची पूजा करून पैश्याचे पाऊस पडू शकतो अशा बाबींवर अंधश्रध्दा ठेवणारा गावचा सरपंच लोमेश दाबले आणि दुचाकीच्या शोरूममध्ये काम करणारा कालिदास हे दोघे ही पदवीधर आहेत. मे २०२१ मध्ये या पूजेसाठी त्यांनी अवघ्या १० दिवसाच्या वाघाचा बछड्याचा बळी दिला होता. पण शेतात पैश्याचा पाऊस न पडल्याने अखेर मृत बछड्याच्या शरीराचे जतन केले. प्रकरण शांत झाल्याचा अंदाज घेऊन वाघाच्या बछड्याचे मृत शरीर त्याने विक्रीसाठी काढले होते. तो २० लाख रुपयात विक्री करणार होता. मात्र, याची चुणूक नागपूर वनविभागाला लागली. त्यामुळे वनविभागाने सक्रिय होत सापळा रचला.

वाघाच्या बछड्याच्या मृतदेहाची विक्री करण्यासाठी लोमेशने त्याचा सहकारी कालिदास रायपूरेला या बाबतचा सौदा करण्यासाठी पडोली येथे खरेदीदाराला भेटण्यासाठी पाठवले होते. याची माहिती नागपूरचे उप वनसंरक्षक डॉ. भारतसिंग हाडा यांना लागली असता त्यांनी सापळा रचून कारवाईची जवाबदारी सहायक वनसंरक्षक नरेंद्र चांदेवर यांना दिली. त्यांनी चंद्रपूर वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी अरुण गाडीवर यांच्याशी समन्वय साधत लोमेश दाबले आणि कालिदास रायपुरे या दोघांना वाघाच्या बछड्याच्या मृतदेहासह ताब्यात घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here