प्राथमिक आरोग्य तपासणी उपक्रम कॉलनी निहाय घेणार- तहसीलदार अनिल गावित

गणेश बेहरे मित्र मंडळाचा स्तुत्य उपक्रम

चोपडा (संदीप ओली) – येथील गणेश बेहेरे मित्र मंडळाच्या वतीने बोरोले नगर 2,बोरोले नगर 3 , शारदा नगर,मधुबन नगर, गुरुकुल नगर या कॉलनी परिसरातील नागरिकांची थर्मल मीटर व पल्स ऑक्सिमीटरच्या साहाय्याने प्राथमिक आरोग्य तपासणी शिबीर या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले याप्रसंगी तहसीलदार अनिल गावित यांनी शहरातील प्रत्येक कॉलनीत स्थानिक नागरिक, स्वयंसेवी संस्था व स्थानिक डॉक्टरांच्या मदतीने प्राथमिक आरोग्य तपासणी उपक्रम घेणार असल्याचे सांगितले.यावेळी त्यांनी कॉलनीत जर संशयित रुग्ण आढळले तर शिबीर घेण्यात येईल असे सांगितले.तसेच चोपडा शहर व तालुक्यातील त्यांनी आरोग्य विभागाच्या चमुचे कौतुक केले.सध्या खबरदारी व काळजी घेणे.तसेच लोकांमध्ये जागृती निर्माण करणे व नागरिकांनी सत्यपरिस्थिती डॉक्टरांना व प्रशासनास देणे इत्यादी गोष्टी या उपक्रमाद्वारे व्हाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली.थर्मल व पल्समिटर च्या साह्याने बऱ्याच गोष्टी समोर येतात.आणि या सर्व गोष्टींची माहिती अपडेट ठेवावी.तसेच प्रशासनाच्या वतीने लोकांना सहकार्य करण्यात येईल व चोपडा शहर,तालुक्यातील अनेक गावांमध्ये पेशंटची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे जून महिन्यात फक्त 42 पेशंट होते आणि आत्ता तो आकडा एक हजाराच्या आसपास आहे.पेशंट वाढण्याची त्यांनी दोन कारणे सांगितली त्यात काही लोकांमध्ये बिनधास्तपणा दिसून येतो ‘दूसरे – काम नसताना लोक बाहेर निघून रस्त्यावर गर्दी करतात.जर या गोष्टी टाळल्या तर कोरोना वर आपण मात करू शकतो. प्राथमिक आरोग्य केंद्रावरसुद्धा स्वॕब घेणे सुरू करण्यात आले आहेत.रुग्णांची लगेच तपासणी करून पुढील उपचारासाठी दाखल करून घेतले जात आहे. तसेच अनेक उपायसुद्धा शासन-प्रशासन राबवीत असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रदीप लासुरकर यांनी SMS पद्धतीवर भर देण्यास सांगितले त्यात एस म्हणजे सोशल डिस्टन्स,M म्हणजे मास्क,तिसरा S म्हणजे सॅनिटायझर तसेच सामाजिक कार्यकर्ते एस.बी.पाटील यांनी कोरोना हा सहज घेण्यासारखा आजार अजिबात नाही व तसेच खूप घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे त्यांनी सांगितले तसेच खबरदारी हा रामबाण उपाय असल्याचे म्हटले.यावेळी बोरोले नगर 2 ,बोरोले नगर 3 ,शारदानगर मधुबन नगर गुरूकुल नगर या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते व उपस्थित नागरिकांपैकी नागरिकांची प्राथमिक आरोग्य तपासणी डॉ प्रदीप लासूरकर ,डॉ संजय जाधव, डॉ ललित चौधरी ,डॉ सुनील पाटील यांनी केली. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार अनिल गावित,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ प्रदीप लासुरकर , उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ मनोज पाटील, सामाजिक कार्यकर्ते एस.बी.पाटील,डॉ संजय जाधव, डॉ ललित चौधरी,डॉ सुनील पाटील यासह गणेश बेहरे मित्र मंडळाचे प्रदीप पाटील,योगेश महाजन,महेंद्र सोनवणे,राजेंद्र पारे,सूर्यकांत जाधव,रामदास जाधव,संजय सैंदाणे,प्रशांत गोड,आर.डी पाटील,मिलींद सोनवणे,नारायण साळुंखे शुभम माळी यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here