मध्यप्रदेशात भीषण अपघातात तीन पोलिसांसह चार ठार

मोरेना (मध्यप्रदेश) : येथे भरधाव वेगाने जाणारी एसयुव्ही गाडी ट्रकला धडकून झालेल्या अपघातात तीन पोलिस कर्मचारी व एसयुव्ही गाडीचा चालक असे चौघेजण ठार झाले तर अन्य एक पोलिस कर्मचारी गंभीररित्या जखमी झाला आहे.

आग्रा-मुंबई महामार्गावर पहाटे चार वाजण्याच्या सुमाराला हा अपघात झाला. ठार झालेले पोलिस कर्मचारी अलिगड येथील आहेत. ते ग्वाल्हेरला निघाले होते वाटेत बनमोरे औद्योगिक वसाहतीजवळ हा अपघात झाला. हे चार पोलिस कर्मचारी एका खासगी गाडीतून तिकडे निघाले होते. त्यात एक पोलिस उपनिरीक्षक आणि तीन कॉन्स्टेबल्सचा समावेश होता.

ही गाडी समोरच्या ट्रकला धडकून हा अपघात झाला. ठार झालेल्यांमध्ये उपनिरीक्षकाचाही समावेश आहे. जखमी कॉन्स्टेबलला ग्वाल्हेरच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर ट्रक चालक पळून गेला असून त्याचा शोध जारी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here