जळगावच्या मृणालिनी चित्तेंनी पटकावला मिसेस इंडिया २०२१

जळगाव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) : राष्ट्रीय पातळीवरील सर्वात मोठा आणि प्रतिष्ठित असा ब्युटी पेजेन्ट विआ मिस अँड मिसेज इंडिया २०२१ या स्पर्धेचा अंतिम सोहळा नुकतेच जयपूर येथे पार पडला. वुमन एक्सलेन्सी अचिवमेंट अॅवार्ड (विआ) यांनी आयोजित केलेल्या या स्पर्धेत जळगाव येथील मृणालिनी चित्ते यांनी विजेतेपद पटकावले असून, याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

नाशिक येथील प्राथमिक स्पर्धेत निवड झाल्यानंतर त्या अंतिम स्पर्धेपर्यंत पोहचल्या होत्या. जळगावच्या मृणालिनी चित्ते यांनी प्रतिष्ठित व नामांकीत असा मिसेस गोल्ड केटेगरी, विआ मिसेज इंडिया २०२१ हा अवार्ड प्रथम क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धेत वेस्टर्न, ट्रॅडिशनल, इंडोवेस्टर्न, स्पार्कल डिझायनर आऊटफिट्स थीम वर आधारित एकूण ३ राउंड झाले. फँशन सिक्वेन्स फायनल मधून टायटल क्राऊन करिता कॅटवॊक केले यामधून टॉप ५ महिलांची निवड करण्यात आली.

नाशिक, पुणे, नागपूर, दिल्ली बेंगलोर यासह संपूर्ण भारतामधून अंतिम स्पर्धेत निवड झालेल्या ३५ सहभागी स्पर्धकांमधून सौ.चित्ते यांनी प्रथम क्रमांक मिळवला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मनोज शर्मा होते तसेच आयोजक हरीश सोनी, मॅनेजमेन्ट हेड ममता गर्ग यांच्या हस्ते अॅवार्ड देण्यात आला.

मृणालिनी चित्ते या धुळे येथील प्रो.एम.जे.सोनवणे यांचा कन्या व जळगावातील प्रख्यात मनोविकारतज्ञ डॉ. प्रकाश चित्ते यांच्या पत्नी आहेत.राष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठेचा मिसेस इंडिया २०२१ अॅवार्ड मृणालिनी चित्ते यांनी मिळवल्याबद्दल त्यांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here