रोटरी क्लब ऑफ शिर्डी साईबाबा यांच्या राष्ट्र निर्माण पुरस्कार वितरण सोहळा

शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) : शिर्डी नगरपंचायतीच्या हद्दीतील रिकाम्या जागेत रोटरी क्लब ऑफ शिर्डी साईबाबा बगीचे शिल्प उभारले जात आहे. यातून साईबाबांच्या शिर्डीचा विकास होत आहे. शिर्डीचे नवे रुप पाहावयास मिळत आहे. त्यामुळे रोटरीच्या माध्यमातून शिर्डीच्या वैभवात भर पडत असल्याचे प्रतिपादन शिर्डीचे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी केले.

शिर्डीतील हॉटेल शांतीकमल येथील रोटरी क्लब ऑफ शिर्डी साईबाबा यांच्या राष्ट्र निर्माण पुरस्कार वितरण सोहळ्यादरम्यान ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष कैलास कोते, उपनगराध्यक्ष सचिन कोते, मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे, अध्यक्ष रविकिरण डाके, सचिव आकाश सोनार, गफ्फारभाई पठाण, आर्दीसह मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्याची साईबाबांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करून करण्यात आले.

राष्ट्र अभिमान म्हणून राष्ट्रगीताचे गायन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र कोते यांनी केले. कोरोना काळात ज्या महिलांना पतीच्या निधनानंतर उपजीविकेचे माध्यम म्हणून दीपाली मुळे यांना रोटरीच्यावतीने शिलाई मशीन देण्यात आले. तर पर्यावरण पूरक गणेशोत्सव स्पर्धेत अनुक्रमे सुचिता घुमरे, दीपा भुतडा व मयूर चोळके यांनी उत्कृष्ट सजावट केल्याबद्दल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये राजू बनसोडे, सचिन घुसळे, अजमत इकबाल मोहम्मद उस्मान, नसरीन इनामदार, संदीप गाडे, माधवराव चौधरी, दत्तू खंडिझोड, सतीश गर्जे, दत्तात्रय गमे, चंद्रकांत महांडुळे, जयश्री घोडेकर, नितीन वाकचौरे, नारायण आभाळे, अशोक गाढवे, आदींना सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमासाठी माजीद पठाण, खजिनदार निलेश गंगवाल, डॉ. पी. जी. गुंजाळ, डॉ. एम. वाय. देशमुख, शरद निमसे, बाळासाहेब कोते, ज्ञानेश डांगे, विलास कोते, सुनील कोते, दत्तात्रय गोंदकर आदींनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here