आज मुंबईत फक्त महिलांसाठी राखीव असे विशेष कोविड १९ लसीकरण सत्र

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) : आज शनिवार (दि. ९) मुंबईतील सर्व शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रांवर फक्त महिलांसाठी राखीव असे विशेष कोविड १९ लसीकरण सत्र होणार आहे. यात सकाळी १०.३० ते सायंकाळी ६.३० पर्यंत होणार लसीकरण, थेट लसीकरण केंद्रावर येवून महिलांना घेता येईल पहिला आणि दुसरा डोस, फक्त महिलांना लस दिली जाणार असल्याने ऑनलाइन पूर्व नोंदणी राहणार आहे.

कोविड-१९ प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आज शनिवार, दिनांक ९ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी १०.३० ते सायंकाळी ६.३० या वेळेत, मुंबईतील सर्व शासकीय आणि महानगरपालिका कोविड-१९ लसीकरण केंद्रांवर फक्त महिलांसाठी राखीव असे विशेष लसीकरण सत्र राबवले जाणार आहे.

मुंबईतील सर्व २२७ निर्वाचन प्रभागांमधील लसीकरण केंद्र आणि त्यासोबत सर्व शासकीय व महानगरपालिका रुग्णालये तसेच कोविड सेंटर येथील लसीकरण केंद्रावर थेट येवून (वॉक इन) महिलांना कोविड लस घेता येणार आहे. ह्यात कोविड लसीची पहिली किंवा दुसरी मात्रा देखील घेता येणार आहे. फक्त महिलांसाठी राखीव विशेष सत्राच्या कारणाने उद्यासाठीची ऑनलाइन पूर्व नोंदणी बंद ठेवण्यात येणार आहे.

कोविड-१९ विषाणू प्रतिबंधक लसीकरण अधिकाधिक वेगाने आणि सर्व स्तरातील नागरिकांपर्यंत नेण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका सातत्याने प्रयत्नशील आहे. त्यासाठी विविध घटकांकरिता विशेष सत्र राबविले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून फक्त महिलांसाठी राखीव लसीकरण सत्र होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here