आता भंगाळे गोल्डमध्येही उपलब्ध दागिन्यांचा मर्दानी बाणा

पुरुषांच्या दागिन्यांना ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जळगाव (प्रतिनिधी) : बदलत्या लाइफस्टाईलमध्ये तसेच बॉलिवूड चित्रपटातील नायकांच्या बदलत्या फॅशनमुळे तरुणांचा वर्ग आता दागिन्यांकडे वळू लागला आहे. हा नवा हटके ट्रेन्ड लक्षात घेता आपल्या ग्राहकांना सातत्याने नावीन्यपूर्ण सेवा देणाऱ्या भंगाळे गोल्डनेही हा दागिन्यांचा मर्दानी बाणा जळगावात उपलब्ध करून दिला आहे.

सोने, चांदीच्या दागिन्यांनासुद्धा तरुणांची पसंती असते. विशेषत: त्यातील अँटिक लुक ते जास्त पसंत करतात. स्टायलिश ज्वेलरीमध्ये प्लॅटिनमसुद्धा तरुण पसंत करतात. याशिवाय मोती, ब्लॅक डायमंड, र्टक्वइश, ओम्ब्रे ग्रीन या प्रेशियस स्टोन्सनासुद्धा तरुणांकडून मागणी आहे. सद्यस्थितीत नावीन्यपूर्ण डिझाईन्समध्ये पुरुषांच्या दागिन्यांमध्ये ब्रेसलेट आणि चेन उपलब्ध आहेत. तसेच इतर दागिन्यांवर भरघोस सूटीसह कुठल्याही दुकानातील दागिन्यांच्या मोडवर घट नाही. कॅरेट मीटरद्वारे सोने शुध्दतेची तपासणीदेखील उपलब्ध आहे.

खास पारंपारिक टच असणाऱ्या व नावीन्यपूर्ण डिझाईन्समध्ये उपलब्ध असणाऱ्या या दागिन्यांना ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे भंगाळे गोल्डचे संचालक भागवत भंगाळे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here