१०६ अफगाणी नागरिक दिल्लीहून इराणमार्गे काबूलला रवाना

नवी दिल्ली (उपसंपादक जीवन षाकया) : तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर पहिल्यांदाच भारतात अडकलेले १०६ अफगाण नागरिक शुक्रवारी दिल्लीहून आपल्या मायदेशी परतल्या. हे अफगाण नागरिक इराणमार्गे अफगाणिस्तानात गेले. महान एअरने काबूल येथून उड्डाण सेवा सुरु केली आहे. अशा परिस्थितीत त्यांच्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली होती.

ट्रॅफिकच्या व्यत्ययामुळे दिल्लीहून महान एअरचे कोणतेही नियमित उड्डाणे नाहीत. १५ ऑगस्ट रोजी तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर काबूलच्या हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन हवाई सेवा बंद करण्यात आली होती.दरम्यान, अफगाण नागरिकांचा हा पहिला गट जो दिल्लीहून अफगाणिस्तानला रवाना झाला आहे. अद्याप भारताने काबूलला थेट विमान सेवा सुरु केलेली नाही. तालिबान राजवटीने अलीकडेच डीजीसीएला पत्र लिहून विमान सेवा पुन्हा सुरु करण्याची विनंती केली असून भारताने अद्याप यावर निर्णय घेतलेला नाही. अफगाणिस्तान दूतावास आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने समन्वय साधला असून अफगाण नागरिकांना परत आणण्यात महत्वाची भूमिका बजावली अशी माहिती देण्यात आली.

गेल्या आठवड्यात अफगाणिस्तानच्या नागरी उड्डयन संस्थेकडून सांगण्यात आले की, काबुल विमानतळ आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी तयार असून तांत्रिक समस्या सोडवण्यात आल्या आहेत. यासंबंधीची घोषणा करताना देशातील नागरी उड्डयन प्राधिकरणाने सांगितले की, काबूल विमानतळावरुन विमानांचे ऑपरेशन पूर्णपणे सुरु झाले आहेत. सामान्य उड्डाणे पुन्हा सुरु करण्यासाठी पूर्ण पायाभूत सुविधा तयार करण्यात आल्या आहेत. अफगाण नागरी उड्डाण संस्थेचे प्रवक्ते मोहम्मद नईम सालेही म्हणाले होते की, नागरी उड्डाण मंत्रालयाने शेजारील देश आणि आंतरराष्ट्रीय समुदायाला पुन्हा हवाई सेवा पुन्हा सुरु करण्याची विनंती केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here