पुणे (उपसंपादक वासंती देवळे) : रोटरी क्लब डिस्ट्रिक्ट ३१३१ आणि ३१३२ यांच्या तर्फे आयोजित पोस्टर आणि व्हिडिओ निर्मिती कार्यशाळेला शनिवारी चांगला प्रतिसाद मिळाला. ही कार्यशाळा साफा बँक्वेटस्,बालेवाडी येथे ९ ऑक्टोबर रोजी पार पडली. ‘ टॉकिंग पिक्चर्स २.० असे या कार्यशाळेचे नाव होते. या कार्यशाळेमध्ये स्मार्टफोनचा उपयोग करून पोस्टर आणि व्हिडिओ कसे तयार करावेत याचे प्रशिक्षण डॉ.जिग्नेश पंड्या यांनी दिले.
प्रांतपाल पंकज शाह, प्रांत पाल डॉ. मोतीपवळे,रोटेरियन क्रांती शाह, उपक्रमाचे समन्वयक सहप्रांतपाल मुकेश गुप्ता, रणजित शेवाळे , मनीषा कोनकर, रत्नाकर शेट्टी, पवन जोशी, जेनीस सोमजी, विवेक गंगणे, सतीश भालेराव, सचिन आवारी, सचिन परमार, किरण राव यांच्यासह रोटरी सदस्य सहभागी झाले.
रोटरी क्लब पुणे कॅम्प , रोटरी क्लब कोरेगाव पार्क,रोटरी क्लब पुना नॉर्थ ,रोटरी क्लब पुणे स्पोर्ट्स सिटी, रोटरी क्लब ई – डायमंड, रोटरी क्लब आंबेजोगाई , रोटरी क्लब सॅटेलाईट इन्स्पायरा, रोटरी क्लब अकोले सेंट्रल , रोटरी क्लब वाधवानी यांच्यातर्फे संयुक्तपणे आयोजन केले .






