जळगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) : धरणगाव तालुक्यातील नावाजलेले वैद्यकीय क्षेत्रातील नाव म्हणजे डॉ.लिलाधर बोरसे. प्रस्तुतज्ञ डॉ.बोरसे यांच्या महाजन हॉस्पीटलला आज १७ वर्ष पूर्ण झाली आहेत.
तालुक्यातील नागरिकांना धरणगाव सारख्या शहरात कमी सोयी सुविधा असतांना सुद्धा उत्कृष्ठ सेवा पुरवून त्यांनी गंभीरातील गंभीर प्रसुतीच्या शस्रक्रिया करून त्यांनी रुग्णांना आपल्या गावातच सेवा पुरविली आहे. या १७ वर्षाच्या काळात त्यांनी अनेक गरजू रुग्णांना नाममात्र शुल्कात सेवा दिली. त्यांनी १७ वर्ष रुग्णांना दिलेल्या यशस्वी कारकिर्दीबद्दल पी एम पाटील सर मित्र परिवारातर्फे सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी नगराध्यक्ष पी एम पाटील सर, माजी प्रभारी नगराध्यक्ष वासुदेव चौधरी,माजी उपनगराध्यक्ष प्रकाश पाटील,माजी नगरसेविका संगीता चौधरी,मेडिकल असोसिएशनचे छोटू जाधव,डॉ धनंजय पाटील,नगरसेवक नंदू पाटील,सकल मराठा समाज अध्यक्ष दिलीप पाटील,उपशहर प्रमुख रवींद्र युवा सेना उपतालुका प्रमुख कमलेश बोरसे,निलेश इंगळे,बुलंद पोलीस टाइम्सचे पत्रकार योगेश पी.पाटील,संजय निराधार समितीचे विलास महाजन,अक्रम खान,घनश्याम जाधव,धनंजय कापडणे सर,दिनेश देशमुख आदी उपस्थित होते.






