जळगांव (संपादक सुनिल पाटील) – जनमत प्रतिष्ठान व कुणाल जडे मार्फत जळगावातील कोविड चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील जनमत प्रतिष्ठान व कुणाल संजय जडे यांच्याकडून विविध ठिकाणी सॅनिटायझेशन करण्याचा उपक्रम सुरु आहे.
आज (दि.७) जनमत प्रतिष्ठान व कुणाल जडे यांनी जी एच रायसोनी कॉलेज, संपूर्ण आरटीओ ऑफिस कार्यालय, आमदार राजूमामा भोळे यांचे कार्यालय, जिल्हा मध्यवर्ती बँक नवी पेठ शाखा, सॅनिटायझेशन करण्यात आले. त्यावेळी रायसोनी कॉलेजचे प्राध्यापक रफिक शेख, आरटीओ ऑफिस कार्यालयाचे इंगळे, आ.राजूमामा भोळे यांच्या कार्यालयाचे राहुल लोखंडे व राहुल पाटील, व बँकेचे विवेक मंगलसिंग सोनवणे यांचे सहकार्य लाभले. यावेळी शिक्षक भारती संघटनेच्या अध्यक्ष शितल ताई जडे, कुणाल जडे, हर्षाली पाटील, जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले व कुणाल जडे आदी उपस्थित होते.









