औरंगाबाद उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद वकील संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल नितीन चौधरी यांचे अभिनंदन

चोपडा प्रतिनिधी (क्राईम रिपोर्टर अनंत चौधरी ) मूळचे धुळे येथील रहिवासी समाज रत्न तसेच सुप्रसिद्ध विधिज्ञ् वकील नितीन चौधरी हे अत्यंत अभ्यासू, आक्रमक व बुद्धिमत्ता अभ्यासक आहेत. त्यांची औरंगाबाद उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद वकील संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तेली समाजातर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

नितीन चौधरी यांनी महाराष्ट्र व गोवा बार कौन्सील असोसिएशन चे देखील अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. तसेच आता उच्चं न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे न्यायालयच्या वकील संघाच्या अध्यक्ष पदी सन्मान जनक निवड झाली असून, याबद्दल समाजबांधवांमध्ये अभिमानाची भावना निर्माण झाली आहे.

त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे जळगाव जिल्हा तेली समाजाचे के. डी. चौधरी सर, जळगाव जिल्हा तेली समाज कायदा आघाडी चे अध्यक्ष ॲडव्होकेट वसंत रावजी भोलाणे, ॲडव्होकेट भागवत माणिक चौधरी व समस्त कार्यरिणी तसेच मल्हारपुरा तीळवण तेली समाज चोपडा अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here