पुण्यातील RSS कार्यालयाबाहेर संशयित बॅग आढळल्यानं खळबळ

पुणे (उपसंपादक वासंती देवळे ) :  पुण्यातील RSS कार्यालयाबाहेर एक संशयास्पद बॅग आढळून आल्याचा फोन विश्रामबाग पोलिसांना  आला आहे. फोन आल्यानंतर पुणे पोलिसांचे बीडीडीएस पथक  तात्काळ घटनास्थळी बोलवण्यात आले. पथकाने पुर्ण बॅग निकामी केली. परंतु यामध्ये कोणतीही संशयास्पद वस्तू मिळाली नाही. मात्र, संशयास्पद बॅग आढळल्याने परिसरात काही काळ तणावाचे  वातावरण होते. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता.

सणासुदीच्या काळात ही घटना घडल्याने पुण्यात खळबळ उडाली होती. ज्या ठिकाणी बॅग आढळून आली त्या ठिकाणी आहिल्यादेवी शाळा असून या शाळेत आज परीक्षा देण्यासाठी विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित आहेत. पोलिसांना  मिळालेल्या माहितीनुसार, ही बॅग रात्रीपासून ठेवण्यात आली होती. फिरस्त्याची ही बॅग असून या बॅगेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला. बॅगेत कोणतीही संशयास्पद वस्तू नसल्याने सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here