शारीरिक संबंधांच्या वादातून पतीने पत्नीच्या डोक्यावर केले कुऱ्हाडीने वार

murder-by-axe
file photo

यवतमाळ (प्रतिनिधी आसिफ कुरैशी) : शारीरिक संबंध ठेवण्यावरून पती पत्नी मध्ये झालेल्या वादात पतीने पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून खून केल्याची यवतमाळ जिल्ह्याच्या घाटंजी तालुक्यातील पगंडी गावात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष गुरुदेव ठाकरे असे आरोपीचे नाव आहे. तर दिशा ठाकरे असे हत्या झालेल्या पत्नीचे नाव आहे. आरोपी संतोष आणि मृत दिशा यांच्यात शारीरिक संबंध ठेवण्यावरून नेहमी वाद होत असत. आरोपी पती मृत महिलेवर दररोज शारीरिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती करत असत.

दरम्यान रविवारी (दि.१०) सकाळी सहाच्या सुमारास देखील त्यांच्यात शारीरिक संबंध ठेवण्यावरून पुन्हा वाद झाला होता. यावेळी संतोषने रागाच्या भरात आपल्या पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीनं गंभीर वार केला. यामध्ये दिशा जागीच मरण पावली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिशाच्या हत्येची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली. या घटनेची माहिती मिळताच घाटंजी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून आरोपी पतीला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास घाटंजी पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here