टपाल तिकिटावर झळकणार प्रसिद्ध मराठी अभिनेते – निर्माते!

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) : जागतिक टपाल दिनाचे औचित्य साधून मुंबई पूर्व डाक विभागातर्फे नॅशनल पोस्ट वीक येत्या ११ ते १६ ऑक्टोबर दरम्यान साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात १२ ऑक्टोबर रोजी रंगकर्मी आंदोलनात सक्रिय सहभागी झालेले अभिनेते – दिग्दर्शक विजय गोखले यांच्या टपाल तिकिटाचे उदघाटन करण्यात येणार आहे.

रंगकर्मी आंदोलनाचे प्रमुख अभिनेते – दिग्दर्शक विजय पाटकर यांचादेखील सत्कार यावेळी करण्यात येणार आहे. नाट्य अभिनेते वैभव मांगले, नाट्य निर्माता राहुल भंडारे यांच्याही पोस्टल तिकीटाचे उदघाटन १४ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता दादर मुख्य पोस्ट ऑफिस, आंबेडकर मार्ग येथे करण्यात येणार आहे.

jagtik-tapal-divas

या चारही कलावंतांनी रंगभूमीला दिलेल्या योगदानाबद्दल भारतीय टपाल विभागातर्फे त्यांना तिकिटांच्या स्वरूपात कौतुकाची थाप देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here