धाराशिव (प्रतिनिधी) : लग्नास नकार दिल्याने येथील१७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ करून तिचे फोटो मोबाईलच्या स्टेटसवर ठेऊन बदनामी करणाऱ्या खानापुर येथील आरोपी विशाल दादा शिंगटे यांच्या विरोधात दि ९ ऑक्टोबर रोजी परंडा पोलिसात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे . आरोपीस दि १० ऑक्टोबर रोजी न्यायालयात हजर केले असता दि १२ ऑक्टोबर रोजी पर्यंत दोन दिवसाची पोलिस कोठडी देन्यात आली आहे .
या बाबत आधिक माहिती अशी की, यातील आरोपी विशाल शिंगटे याने गावातील एका मुलीस लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता मुलीच्या कुटूंबाकडून प्रस्ताव फेटाळन्यात आल्याने मुलीच्या व कुंटूबाविरूद्ध राग मनात धरून आरोपी शिंगटे याने त्याच्या पीकअप गाडीत मुलीचा हात धरून बळजबरीने गाडीत बसविले लज्जा वाटेल असे कृत्य करून तिच्या सोबत फोटो काढले व कोणास सांगीतल्यास फोटो वायरल करून तुझी बदनामी करीन अशी धमकी दिली होती
दि ८ ऑक्टोबर रोजी मुलीचा फोटो स्टेटस वर ठेऊन बदनामी केली या प्रकरणी पिडीत मुलीच्या वडीलाने दिलेल्या फिर्यादी वरून , आरोपी विशाल शिंगटे विरूद्ध दि ९ ऑक्टोबर रोजी विनयभंग , बाल लैंगीक अत्याचार , माहिती तंत्रज्ञान , धाक दाखवने इत्यादी कलमा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे , पुढील तपास पोलिस निरिक्षक सुनिल गिड्डे हे करीत आहेत .






