खुलताबाद पोलीस ठाण्यात अपुरे कर्मचारी

बाजार सावंगी (प्रतिनिधी मुनीर शहा) : खुलताबाद पोलीस ठाण्यात अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे अधिकाऱ्यांमुळे कायदा व सुव्यवस्थेची पार वाट लागली असून या अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे व अधिकाऱ्यांमुळे खुलताबाद शहरात व ग्रामीण भागात कुठल्याच प्रकारची कार्यवाही व चौकशी होत नसल्याने व येथील पोलिस ठाण्यात एक पोलिस निरीक्षक व तीन सहाय्यक पोलिस निरीक्षक असे एकूण चार मुख्यालयी अधिकारी असून या पोलिस ठाणे अंतर्गत अपुरे बीट जमादार अपुरे कॉन्स्टेबलची त्यात अपूर्ण होमगार्ड संख्या असल्यामुळे सुजलाम सुफलाम तालुक्याची पार वाट लागली आहे

एकच पोलीस स्टेशन असल्यामुळे कुठलीच कारवाई होताना दिसून येत नाही विशेष म्हणजे तालुक्याच्या पोलीस ठाण्यातच अपूरा पोलीस स्टॉप असल्याने पोलिस चौकीत काय करणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे या पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पोलीस चौक्या येथे देखील अपुरे कर्मचारी असल्यामुळे कुठल्याच प्रकारचा तपास कार्यवाही दंडात्मक कार्यवाही, कोर्टात ने-आण करण्यासाठी, आरोपीला कोर्टात वेळेवर हजर करणे शक्य दिसून येत नाहीत.

याकडे विशेष पोलीस महानिरीक्षक. गृहमंत्रालय . औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक पोलीस महानिरीक्षक. डी वाय एस पी.या वरिष्ठ अधिकार्‍यांनी जातीने लक्ष घालून खुलताबाद येथील पोलीस ठाण्यातील अपुऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या लवकरात लवकर परिपूर्ण झाली तर कायदा व सुव्यवस्था सुरळीत होईल अशी मागणी खूलताबाद शहरासह ग्रामीण भागातील नागरिकातून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here