धुळे (विशेष प्रतिनिधी) : केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी कायद्या संदर्भात एक वर्षापासून शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनात केंद्रीय गृहराज्यमंत्री श्री अजय मिश्रा यांच्या मुलाने पुढे चालणाऱ्या शेतकऱ्यांवर मागून वाहनाने येऊन निरपराध शेतकऱ्यांना चिरडले.
या हिंसक घटनेच्या निषेधार्थ शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी आज सोमवार दि.११ ऑक्टोंबर २०२१ रोजी सर्व शिवसैनिक, पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी भारत बंद यशस्वी करावा असे आवाहन, शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांनी केले आहे.






