कोंढवा पोलीसांनी पिस्तुलासह केली दोन आरोपींना अटक

पुणे (पश्चिम महाराष्ट्र उपसंपादक सदानंद काळे) : दिनांक ०९/१०/२०२१ . कोंढवा पोलीस स्टेशन , पुणे शहर गावठी पिस्टल व जिवंत काडतुसे जवळ बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आले आहे.

दि .०८/१०/२०२१ रोजी मा.पोलीस आयुक्त सो पुणे शहर यांच्या आदेशाप्रमाणे पुणे शहरात ऑ आउट कोम्बींग ऑपरेशन राबविण्यात आले होते . त्याप्रमाणे कोंढवा पोलीस ठाणे हद्दीतही मा . वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सरदार पाटील , मा.पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) जगन्नाथ जानकर , यांच्या सुचनाप्रमाणे तपास पथक अधिकारी पोलीस उप निरीक्षक श्री पी यु कापुरे , पोलीस अंमलदार योगेश कुंभार , अमोल हिरवे , महेश राठोड , गणेश चिंचकर , दिपक जड़े , अभिजीत रत्नपारखी , जयदेव भोसले , तुषार आल्हाट असे ऑल आउट कोम्बींग ऑपरेशन करत असताना पोलीस अंमलदार गणेश चिंचकर , योगेश कुंभार यांना बातमीदारामार्फतीने बातमी मिळाली की , कान्हा हॉटेलच्या चौकातील पी.एम.टी. बस स्टॉपच्या जवळ एक चॉकलेटी रंगाचा फुल भायाचा शर्ट घातलेला , केस वाढलेल्या इसमाच्या कमरेला पिस्टल बाळगलेला असुन तो पिस्टल विक्री करण्यासाठी आलेला आहे . मिळालेल्या बातमीप्रमाणे कोंढवा पोलीस ठाणेकडील तपास पथक सदर ठिकाणी ट्रॅप लावुन थांबले असता एक इसम कान्हा हॉटेलच्या चौकातील पी.एम.टी. बस स्टॉपच्या डाव्या बाजुला एक चॉकलेटी रंगाचा फुल भायाचा शर्ट घातलेला , केस वाढलेला कोणाची तरी वाट पाहत असल्याचे दिसला . त्याच्या हालचालींवर लक्ष्य ठेवुन थांबुन राहिले असता काही वेळातच संशयीत इसमास बस स्टॉफच्या उजव्या बाजुने एक इसम चालत येवुन काहीतरी बोलणे करुन ते दोघे तेथुन निघुन जावु लागले

त्यावेळी आम्ही त्यास सोबतचे स्टाफचे मदतीने पकडुन त्यांना त्यांचे नांव व पत्ता विचारता त्यांनी त्यांची नावे प्नील प्रदिप जगताप , वय २२ वर्षे , खाजगी नोकरी , रा . मु.पो. सुलतानपुर , कमानीखाली , ता . वाई , जि . सातारा, अमन ईस्माइल सय्यद वय २१ वर्ष , रा . सय्यदनगर , दादा गुजर इंग्लीश स्कुल शेजारी , महंमदवाडी पुणे मुळ रा . मु.पो. बोपर्डी ता . वाई जि . सातारा असे असल्याचे सांगितले .

त्यांची अंगझडती घेता स्वप्नील जगताप याचे कमरेला एक देशी बनावटीचे पिस्टल ५०,००० / – रु कि व ४ जिवंत काडतुस ४०० / – रु किं . मिळुन आले ते पंचनाम्याने जप्त करण्यात आलेले आहे . आरोपी हयाच्याकडे अग्नीशस्त्राबाबत विचारपुस केली असता आरोपी क्रं .०२ अमन सय्यद याने जवळ बाळण्यासाठी मागणी केल्याने विक्री करण्यासाठी आणले असल्याचे सांगितले आहे . त्यांच्या विरुध्द कोंढवा पोलीस ठाणे येथे गु.र.नं .८६४ / २०२१ भारतीय हत्यार कायदा कलम ३(२५ ) , ७ (२५ ) महाराष्ट्र पोलीस अॅक्ट कलम ३७ ( १ ) सह १३५. गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन आरोपीस अटक करण्यात आलेली आहे . त्यांना मा . न्यायालयासमोर हजर केले असता मा . न्यायालयाने दि .. ११/१०/२०२१ रोजीपर्यंत पोलीस कोठडी मंजुर केली आहे. सदर गुन्हयाचा तपास पोलीस पोलीस उप निरीक्षक प्रभाकर कापुरे करीत आहेत .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here