सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी विजयकुमार दिवाणजी) : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे घडलेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकार आज महाराष्ट्र्र बंदची हाक दिली आहे. राज्यात अनेक ठिकाणी बंद पाळण्यात येत आहे. मात्र सोलापूरात युवा सेनेच्यावतीनं संगम येथे टायर जाळून बंदची सुरुवात झाली आहे.
युवासेना माळशिरस तालुक्याच्या वतीने संगम येथे युवा सेनेच्या वतीनं आंदोलन करण्यात येत आहे. युवा सेना तालुका प्रमुख गणेश इंगळे शहर प्रमुख शेखर खिलारे यांच्या नेतृत्वाखाली आज शेतकरी समर्थनार्थ महाराष्ट्र बंद आंदोलन सुरुआहे. या आंदोलनात सहभागी होऊन रस्त्यावर टायर जाळून बंदची सुरुवात झाली.
यावेळी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्री यांचा निषेध करत राजीनामा द्यावा आणि भारतीय शेतकरी जिंदाबाद अशा घोषणा देण्यात आल्या.






