‘सिंगल युज प्लास्टिक फ्री कॅम्पस’संकल्पनेच्या जनजागृतीस प्रारंभ; तेर पॉलिसी सेंटरचा पुढाकार

प्लास्टिकच्या धोक्याविरूद्ध दीर्घकालीन धोरण आखण्याची गरज : हँन्स फ्रेडनलंड

पुणे (उपसंपादक वासंती देवळे) : ‘ सिंगल युज प्लास्टिक फ्री कॅम्पस’ संकल्पनेच्या जनजागृतीसाठी ‘तेर पॉलिसी सेंटर’ या पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्थेने पुढाकार घेतला असून या उपक्रमाचा प्रारंभ आंतरराष्ट्रीय पातळीवरील मान्यवरांच्या उपस्थितीत ११ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता फर्गसन महाविद्यालयात झाला.

नॉर्वेचे भारतातील राजदूत हँन्स जेकब फ्रेडनलंड, युनोचे माजी अंडर सेक्रेटरी जनरल एरीक सॉल्हेम या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते मार्गदर्शक पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. पाहुण्यांच्या हस्ते फर्गसन महाविद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण देखिल करण्यात आले.



हॅन्स जेकब फ्रेडनलंड म्हणाले, ‘ प्लास्टिकमुळे होणारे प्रदूषण वाढले असून पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. समुद्रामध्येही प्लास्टिक साठू लागले आहे. प्लास्टिकच्या धोक्याविरूद्ध दीर्घकालीन धोरण आखण्याची , एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे. या संदर्भात भारताशी सर्व सहकार्य करायला नॉर्वे तयार आहे. एरीक सोल्हेम म्हणाले, ‘ पृथ्वीवर पर्यावरण धोक्यात आले आहे. त्याबाबत हरित उपाययोजना केल्या जात असल्या तरी ‘ सिंगल युज प्लास्टिक फ्री कॅम्पस ‘ संकल्पना अधिकाधिक ठिकाणी अंमलात आणली पाहिजे.

प्राचार्य डॉ. रवींद्रसिंह परदेशी यांनी प्रास्ताविक केले.’ सिंगल युज प्लॅस्टिक फ्री कॅम्पस ‘ संकल्पनेची माहिती डॉ. राजेंद्र शेंडे यांनी दिली. ते म्हणाले, ‘ जगातील शांतता आणि शाश्वत विकास यांचे नाते आहे. पर्यावरण संवर्धनातून ते नाते हातात हात घेऊन वृद्धींगत केले पाहिजे. शहरात’हिरवाईची बेटे’तयार करणाऱ्या,वनश्री जपणाऱ्या ‘टाटा मोटर्स’चा तसेच पर्सिस्टंट फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सोनाली देशपांडे यांचा सन्मान याच कार्यक्रमात करण्यात आला.



नॉर्वेचे भारतातील राजदूत हँन्स फ्रेडनलंड,युनोचे माजी अंडर सेक्रेटरी जनरल एरिक सॉल्हेम, तेर पॉलिसी सेंटरचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र शेंडे,फर्गसन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रवींद्रसिंह परदेशी, डॉ. विनीता आपटे हे मान्यवर व्यासपीठावर कार्यक्रमाला उपस्थित होते.

प्राचार्य डॉ. रवींद्रसिंह परदेशी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे , डॉ. स्वाती जोगळेकर आदी मान्यवर सभागृहात उपस्थित होते.तेर पॉलिसी सेंटरच्या संस्थापक संचालक डॉ.विनीता आपटे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here