बाजार सावंगी (प्रतिनिधी मूनीर शाह) : लखीमपूर खिरी प्रकरणी महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला खुलताबाद तालुक्यातील बाजार सावंगीत कडकडीत बंद पाळून प्रतिसाद देण्यात आला.
शासकीय कार्यालये, शाळा, आवश्यक दुकाने औषधी दुकाने दवाखाने वगळता मुख्य बाजारपेठ, बस स्टँड एरिया, नवीन मार्केट, ताजनापूर शिरोडी फाटा पाँईट, जिल्हा परिषद शाळा परिसर, दवाखाना परिसर, सावंगी – जैतखेडा रोड एरियासह बाजारसावंगी कडकडीत बंद असून लखिमपूर खेरी येथे चार शेतकरी व अन्य तीन मोर्चा दरम्यान अंगावर गाडी घालून चिरडले या बद्दल महाराष्ट्र बंदची हाक महाविकास आघाडीने दिले असल्याने येथे कडकडीत बंद व शेतकऱ्यांना श्रद्धांजली व निषेध सभाचे आयोजन करण्यात आले होते.
कडकडीत बंदमुळे शहरातील सर्व दुकानदारांनी दुकाने बंद ठेवली होती. रस्त्यावर वाहने नसल्याने शुकशुकाट होता. रस्त्यावर तुरळक वाहने पाहण्यास मिळाली.







