मुंबई (प्रतिनिधी रक्षा गोराटे) : ” व्यसन घालवा ‘ उत्सव वाचवा ” नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य व आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्स आयोजित व्यसनमुक्त भारत अभियान “स्त्री अत्याचाराच्या मुळाशी आहे व्यसन , व्यसनमुक्त समाज निर्माण करून, महिला अत्याचारमुक्त समाजाची देऊयात खात्री, स्त्री सन्मानासह साजरी करूयात नवरात्री असे आवाहन केले आहे.
भारतीय संस्कृतीत सणांना मोठे स्थान आहे. प्रत्येक सण चांगल्याचा वाईट प्रवृत्तीवर विजय अश्या आशयाचे असतात, त्याचा आनंद साजरा करणे म्हणजेच उत्सव. परंतु उत्सवावर आज व्यसनांची छाया दिवसंदिवस गडद होतांना दिसत आहे . चांगल्याचा वाईटवर विजय असा संदेश देणाऱ्या उत्सवामध्ये जर व्यसनासारखे वाईट विघातक कृतीला , वृत्तीला किंवा वस्तूला जर प्रोत्साहन दिले जात असेल तर अश्या उत्सवाला , उत्सव म्हणता येईल का ? तर नक्कीच नाही . यास्तव नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्स आणि आयुषमान प्रतिष्ठाण मुंबई यांनी येत्या नवरात्रोत्सवात ” व्यसन घालावा – उत्सव वाचवा ” ही मोहीम राबविण्याचे ठरविले आहे.

नवरात्रोत्सव मंडळाने व्यसनी पदार्थ किंवा व्यसनी पदार्थांच्या नावाशी मिळत्या जुळत्या पदार्थांची जाहिरात स्वीकारू नये असे नम्र आवाहन आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्स नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य, आयुषमान प्रतिष्ठाण मुंबई यांच्या वतीने करण्यात येत आहे .
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नवरात्रोत्सव याकाळात व्यसनांच्या विरोधात प्रचार , प्रसार करण्यासाठी तसेच समाजात व्यसनांना प्रतिष्ठा मिळू नये याकरिता प्रचार पत्रके वाटप , गीत , पथनाट्याच्या माध्यमातून स्वयंसेवकांसमवेत महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातील नामांकित सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांमध्ये व्यसनांच्या संदर्भात जनजागृती करण्यात येणार आहे. सदर अभियान महाराष्ट्र राज्यात संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येणार असून आदिमाया स्त्री शक्तीस महाराष्ट्र राज्य व्यसनमुक्त करण्यासाठी साकडे घालण्यात येणार .
व्यसनांना समाजात प्रतिष्ठा मिळू नये तसेच व्यसनमुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी सर्वांना आवाहन करण्यात आले असल्याचे यावेळी श्री राजीव निवतकर जिल्हाधिकारी मुंबई, श्री समाधान इंगळे सहाय्यक आयुक्त सामाजिक न्याय विभाग मुंबई विभाग , मा प्रसाद खैरनार सहाय्यक आयुक्त सामाजिक न्याय विभाग मुंबई उपनगर, श्रीमती वर्षा विद्या विलास सरचिटणीस नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य, श्री अमोल मेडामे चिटणीस नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य , तसेच आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्सचे अॅड.डॉ विक्रांत वाघचौरे संस्थापक अध्यक्ष, श्री बसवराज शिंदे राष्ट्रीय अध्यक्ष,श्री भरत चवरे राष्ट्रीय उपाध्यक्ष, श्री गणेश वाघचौरे राष्ट्रीय महासचिव , श्री अशोक लांडगे राष्ट्रीय जनसंपर्क अधिकारी व मुंबई शहर संघटक नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य व आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्स, श्री विवेक साळवी महाराष्ट्र राज्य जनसंपर्क अधिकारी श्री केतन पाटील प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य, श्री नागनाथ धोत्रे संचालक महाराष्ट्र राज्य, मुंबई लीगल एड सेलचे अॅड.अभय सोडये यांनी आवाहन केले आहे.






