रायगडमध्ये महाराष्ट्र बंदला व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

अलिबाग-सोगावकर : उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे शेतकऱ्यांच्या विरोधात झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ, लखीमपूर खेरी येथे आंदोलक शेतकऱ्यांना चिरडण्याच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने अर्थात सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने आज दिनांक ११ ऑक्टोबर रोजी, सोमवारी ‘ महाराष्ट्र बंद ‘ पुकारला आहे.



या बंद मध्ये सर्व अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या असून सत्ताधारी पक्षांनीच आवाहन केल्याने सारे व्यवहार बंद आहेत. या बंदला आधी काही व्यापाऱ्यांनी विरोध दर्शवला होता. मात्र नंतर नरमाईची भूमिका घेत बंदला पाठिंबा असल्याचे व्यापाऱ्यांनी जाहीर केले .



त्याप्रमाणे सकाळपासूनच सर्व व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने बंद ठेऊन महाराष्ट्र बंद ला चांगला प्रतिसाद दिला आहे. शिवसेना बंदमध्ये सहभागी असल्याने बंदला व्यापाऱ्यांनी विरोध करण्याचे टाळले असल्याचे दिसत आहे.



LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here