मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) : जागतिक टपाल दिनाचे औचित्य साधूंन सिंधुदुर्ग डाक विभागातर्फे नॅशनल पोस्ट वीक येत्या ११ ते १६ ऑक्टोबर दरम्यान साजरा करण्यात येणार आहे. सोमवारी संपन्न झालेल्या कार्यक्रमात सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक दिपक कदम यांच्या टपाल तिकिटाचे उदघाटन करण्यात आले आहे.
दिपक कदम यांनी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल भारतीय टपाल विभागातर्फे त्यांना तिकिटांच्या स्वरूपात कौतुकाची थाप देण्यात आली आहे. या प्रसंगी सिंधुदुर्ग जिल्हा डाकघर अधीक्षक ए. बी. कोड्डा, डाक निरीक्षक मनोज पवार, डेव्हलपमेंट ऑफीसर बालाजी मुंडे, मुख्याध्यापक अशोक ठोंबरे, डाक आवेक्षक , देवगड उपविभाग विकास मुणगेकर आदी उपस्थित होते.







