जळगाव (क्राइम रिपोर्टर शाहिद खान) : सर्वसामान्य नागरीकांना सुख सुविधा द्यावे याकरीता आरपीआय आठवले गटाचे मनपा समोर आंदोलन जळगाव शहर महानगरपालिका ने मूल्यांकन मध्ये दरवाढ केल्याच्या निषेधार्थ आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने महानगरपालिकेसमोर आंदोलन करण्यात आले.
आंदोलनात प्रमुख मागणी शहरातील रस्त्याची अक्षरश चाळणी झाली असून दैनंदिन स्वच्छता चांगल्या शाळा मिळाव्या गटारी साफ कराव्या अशा विविध मागण्यांच्या संदर्भात आज पक्षाचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली.
याप्रसंगी युवकअध्यक्ष मिलिंद सोनवणे कार्याध्यक्ष सागर सपकाळे सचिन अडकमोल महानगर उपाध्यक्ष प्रताप बनसोडे जेष्ठ नेते यशवंत घोडेस्वार बबलू शिंदे नरेंद्र मोरे .भिमराव सोनवणेअनिल लोंढे संदीप तायडे अक्षय मेघे हरीश शिंदे शांताराम अहिरे मनोहर इंगळे चंद्रकांत खरोटे जुलाल बाविस्कर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थितीत यावेळी घोषणाने परिसर दणाणून सोडला होता.






