मुंबई (क्राइम रिपोर्टर प्रितेश मांजरेकर) : माणिकपुर पोलीस ठाणे गुन्हा रजि. नंबर १९५/२०२१ भा.द.वि. कलम ४२०,४०६,३४ तसेच महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील हितसंबंधाचे संरक्षण) १९९९ चे कलम ३,४ प्रमाणे दिनांक- २१/०५/२०२१ रोजी १३:१० वा दाखल करण्यात आला होता. नमुद गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक अनंत पराड, नेम. आर्थिक गुन्हे शाखा, मि.भा.व.वि यांचेकडे देण्यात आला होता.
आरोपीत १) अमित कांतीलाल जैन रा. रो हाऊस नं.०४, क्लस्टर-०७, स्पॅनिश बिला, चिंचोटी गाव, नायगाव पुर्व, ता.वसई, जि.पालघर २) योगेश विजय भालेराव रा.बी/ ७०४, साईप्रभा कॉम्पलेक्स, वसंतनगरी वसई ता.वसई जि.पालघर यांनी Aaj Edu Plus Consultancy Pvt.Ltd नावांची कंपनी पत्ता तुंगारेश्वर स्वीट मार्टच्या वर रेल्वे स्टेशन वसई पश्चिम येथे सुरु करुन वसई-विरार परिसरातील नागरिकांना गुंतवणुकदारांना त्यांचे गुंतवणुकीवर २५ ते ५० टक्के असे भरघोस व्याज देण्याचे अमिष दाखवुन २१५ गुंतवणुकदार यांचेकडुन एकुण ८,७१,४१,६४८/- रुपये गुंतवणुक केलेली रक्कम गुंतवणुकदार यांना परत न करता गुंतवणुकदारांची करोडो रुपयाची फसवणुक करुन पळुन गेलेले होते.
वर नमुद गुन्हयातील आरोपीत हे अपहरीत रक्कम घेवुन दुबई व मुंबई येथे फरार झाले होते. नमुद आरोपीत यांची माहिती मिळणेकामी ब्युरो ऑफ इमिग्रेशन,दिल्ली यांना पत्र देवुन तसेच आरोपीत यांचे बाबत तांत्रिक तपास करुन तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक अनंत पराड व पो. अंम/ २६५२ संभाजी कदम यांना आरोपीत अमित जैन हा चिचोटी येथे आल्याची बातमी मिळाल्याने त्यांनी सापळा लावुन आरोपीत अमित कांतीलाल जैन यांस दिनांक २०/०९/२०२१ रोजी अटक केली तसेच फरार आरोपीत योगेश विजय भालेराव हा दुबई येथुन भारतात आले बाबत ब्युरो ऑफ इमिग्रेशन,दिल्ली यांचेकडुन माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक अनंत पराड, पो.अंम/ २६५२ संभाजी कदम यांना आरोपीत योगेश भालेराव हा उंबरगांव गुजरात येथे असल्याची माहिती बातमीदार यांचेकडुन मिळाल्याने तात्काळ उंबरगांव येथे जावुन आरोपीत योगेश भालेराव यांस दिनांक ०२/१०/२०२१ रोजी ताब्यात घेतले. तसेच आरोपीत अमित जैन याने फसवणुकीच्या रक्कमेतुन चिचोटी वसई येथे विकत घेतलेले ५० लाख रुपये किंमतीचा रोहाऊस बंगला तसेच आरोपीत योगेश भालेराव याने जेजुरी जि.पुणे येथे रेल्वे स्टेशन जवळ विकत घेतलेली १ गुंठा जागा, १२ लाख रुपये किंमतीची गुन्हयाचे तपासकामी जप्त/ संरक्षित करण्यात आली आहे.
सदरची कारवाई महेश पाटील, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), पद्मजा बढे, सहायक पोलीस आयुक्त (आर्थिक गुन्हे शाखा), यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक,अनंत पराड, पो. अंम. /२६५२ संभाजी कदम यांनी केली आहे.






