मुंबई (क्राइम रिपोर्टर प्रितेश मांजरेकर) : अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. एस. एस. पाटील यांना त्यांच्या विश्वासनीय खबऱ्याकडुन माहिती प्राप्त झाली की, दहिसर परिसरात राहणारे इसम नामे विकी उर्फ विजय यादव, विशाल व राहुल हे ऑनलाईन जाहिरात करतात व गि-हाईकाने मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला की, ते वेश्या व्यवसायासाठी वसई व मिरा भाईन्दर परिसरातील लॉजमध्ये रुम बुक करुन किंवा गि-हाईकास लॉजमध्ये रुम बुक करावयास लावून किंवा गि-हाईकाचे सोयीनुसार वेश्यागमनाचा मोबदला घेवून गि-हाईकास मुली पुरवितात.
सदर बातमीच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. एस. एस. पाटील यांनी बोगस गि-हाईक व पंच यांना लोढा अॅक्वा बिल्डींग समोरील सर्विस रोड, पाडुरंग वाडी, काशिमिरा या ठिकाणी पाठवुन सत्यता पडताळुन पोलीस पथकासह छापा टाकला असता महिला वेश्यादलाल १) मंजु उर्फ रुक्साना अझादअली खातुन, रा. म्हाडा शिप्टींग बिल्डींग, सर्विस रोड, काशिमिरा, ता. जि. ठाणे. मुळ रा. नईहट्टी, आझादअली, एटी घोष रोड, गौरी पुर, उत्तर चौविस परगाना, पं. बंगाल व तिचा साथीदार अफसर रफिक शेख, व्यवसाय रिक्षा चालक रा. साईकृपा नळकमीटी चाळ, नवागाव, आयसी कॉलनीच्या बाजुला, दहिसर पूर्व. हे अॅटो रिक्षा क्र. MH.47.AJ.4167 मधुन वेश्यागमनाच्या मोबदल्यात पैसे स्विकारुन पुरुष ग्राहाकांना मुली पुरवित असतांना मिळुन आल्याने वेश्यागमनाकरीता स्वीकारलेल्या रक्कमेसह ताब्यात घेवुन ०१ पिडित मुलीची सुटका करण्यात आली. सदर बाबत पोहवा/२२६९ उमेश हरी पाटील यांचे फिर्यादीवरुन आरोपी मंजु उर्फ रुक्साना खातुन व तिचा साथीदार अफसर शेख व पाहिजे आरोपी विकी, विशाल व राहुल यांच्या विरुध्द दि.०२.१०.२०२१ रोजी काशिमिरा पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. नं. [ ६६९/२०२१ भा.द.वि.सं. कलम ३७०, ३४ सह अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा १९५६ चे कलम ४, ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनांक ०५.१०.२०२१ रोजी गार्डन कोर्ट बिल्डींग गेट समोर, अमृतवाणी रोड, भाईंदर पश्चिम या ठिकाणी छापा टाकुन कारवाई दरम्यान पुरुष वेश्यादलाल १) दिपक उर्फ नुरुज्जंमान लुकमान लष्कर, सध्या रा. गिरिष अपार्टमेन्ट, ठाकुर पाडा, सम्राट नगर, मुंब्रा पोलीस ठाण्याचे समोर मुंब्रा, जिल्हा ठाणे मुळ रा. गावपश्चिम बंगाल व त्याचा साथीदार २) मोरताहजुल मोमीन मुल्ला, सध्या रा. मामा चाळ, खार पाईप लाईन, धोबी घाट, हनुमान मंदिराजवळ, खार मुंबई, मुळगाव- पश्चिम बंगाल हे वेश्यागमनाच्या मोबदल्यात पैसे स्विकारुन पुरुष ग्राहाकांना मुली पुरवित असतांना मिळुन आल्याने वेश्यागमनाकरीता स्वीकारलेल्या रक्कमेसह ताब्यात घेवुन ०१ पिडित महिलेची सुटका करण्यात आली. सदर बाबत पोहवा/२२६९ उमेश हरी पाटील यांचे फिर्यादीवरुन आरोपी दिपक उर्फ नुरुज्जंमान लष्कर व मोरताहजुल मुल्ला व पाहिजे आरोपी संजय यांच्या विरुध्द भाईंदर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. नं. ४०५/२०२१ भा.द.वि.सं. कलम ३७०, ३४ सह अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा १९५६ चे कलम ४, ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई डॉ. महेश पाटील, पोलीस उप.आयुक्त (गुन्हे), रामचंद्र देशमुख, सहा. पोलीस आयुक्त, (गुन्हे) मि.भा.व.वि.पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली व.पो.नि. संपतराव पाटील, सपोनि तेजश्री शिंदे-भरोसा सेल, पो.हवा./२२६९ उमेश पाटील, पोहवा/१६३ रामचंद्र पाटील, पोशि/३६६० केशव शिंदे, मपोशि/१०७८ सुप्रिया तिवले, चा.पोना/२६३८ गावडे व मपोशि/४१०८ जुन्नेदी अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, भाईंदर यांनी केली आहे.






