श्री आचार्य शांतिसागर स्मारक श्री१००८ आदिनाथबाहुबलीदिगंबरजैनमंदिर,बोरीवली

मुंबई: (सुभाष शांताराम जैन): मुंबईमध्ये बोरिवली येथे नॅशनल पार्क बाजूला जैन समाजाचे सुंदर मंदिर आहे. मंदिराचे नाव आदिनाथ बाहुबली दिगंबर जैन मंदिर आहे. मंदिराला दिगंबर तीन मुर्ती जैन मंदिर या नावानेही ओळखतात. मंदिरा समोर सुंदर विशाल प्रवेशद्वार आहे. पहिले तीर्थंकर आदिनाथ भगवान यांचे सुपुत्र बाहुबली भगवान, भरत भगवान यांच्या विशाल मूर्ती दृष्टीस पडतात. मूर्ती तेजस्वी सुंदर हास्यमुद्रा असलेले आहेत. मग त्यांना पाहून नकळत साष्टांग दंडवत घालण्याचा मोह आवरत नाही. इथेच चोवीस तीर्थंकर भगवानांच्या सुंदर तेजस्वी प्रसन्न मुद्रेतील मूर्ती आहेत. महावीर स्वामींच्या आधी 23 तीर्थंकर होऊन गेले. प्रथम तीर्थंकर आदिनाथ स्वामी, चोवीसवे तीर्थंकर भगवान महावीर स्वामी.महावीर स्वामींच्या आधी पार्श्वनाथ भगवान होऊन गेले. मुनींचे चरण कमल असलेल्या चरण स्मृती येथे आहेत.

प्रथम क्षेत्रपाळ शेवटी पद्मावती देवीची मूर्ती आहे. चंद्रप्रभू भगवंतांच्या ही मूर्ती येथे आहेत.जैन मुनींची राहण्याची व्यवस्था आहे. ही भूमी जैन मुनींच्या वास्तव्याने पावन पवित्र झालेली आहे. मंदिर समोर विशाल उंच मानस्तंभ आहे.जैन समाजाचे मोठे मोठे संमेलन महोत्सव, मोठ्या पुजा येथे होतात. मंदिराचे दुरुस्तीचे सध्या काम चालू आहे. मी लेखक सुभाष शांताराम जैन अलीकडेच मंदिराला भेट दिली. लेखातील सर्व फोटो व्हिडिओ सुभाष शांताराम जैन यांनी काढली आहेत. ऑक्टोबर महिना 20 21 रोजी भेट दिली.मन प्रसन्न झाले.

जायचे कसे? ठाणे स्टेशन येथून बोरीवली बसेस जातात. मध्य रेल्वेने दादर येथे उतरून पश्चिम रेल्वेने बोरिवली गाडी उपलब्ध आहे. ठाण्याहून कॅडबरी जंक्शन इथूनही बसेस उपलब्ध आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here