खुलताबाद (प्रतिनिधी समीर शाह) : तालुक्यातील बाजार सावंगी येथे पत्रकाराला मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
बाजार सावंगी येथील पोलीस पाटलांच्या विरोधात बातमी लावल्या कारणामुळे बाजार सावंगी येथील पत्रकार मुनीर शहा यांना कुऱ्हाड व लाठ्याकाठ्यांनी २५ ते ३० लोकांनी ही मारहाण केल्याची माहिती मिळते.







