मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) : अभिनेता सलमान खानच्या प्रत्येक चित्रपटाची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता असते. त्यामुळेच चाहते सलमान खानचा आगामी बहुचर्चित चित्रपट ‘अंतिम: द फायनल ट्रुथ’ चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहात आहेत.
यामध्ये सलमानची बहीण अर्पिताचा पती अर्थातच अभिनेता आयुष् शर्मासुद्धा दमदार भूमिकेतआहे. या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालं असून, चाहत्यांना या चित्रपटाच्या रिलीज डेटची प्रतीक्षा होती. आता ही प्रतीक्षा देखील संपली आहे.
सलमान खानने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून नुकतीच या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे.
#Antim releases in theatres worldwide on 26.11.2021
It has been a gr8 & cherished association with ZEE and @punitgoenka over the years having done many films Race3,Loveyatri, Bharat, D3,Radhe & now Antim
I am confident he will take Zee to much greater heights in the coming years pic.twitter.com/TwzlvA0anR— Salman Khan (@BeingSalmanKhan) October 12, 2021
अभिनेता सलमान खानने नुकताच ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे. ‘अंतिम:द फायनल ट्रुथ’ जगभरातील चित्रपटगृहात २६-११-२०२१ ला म्हणजेच २६ ऑक्टोबरला रिलीज करण्यात येणार आहे.झी आणि पुनीत गोयंकासोबत आमचं एक दिमाखदार असोसिएशन आहे. अलीकडच्या काही वर्षांत आम्ही अनेक चित्रपट जसे की – रेस 3, लवयात्री, भारत, डी 3, राधे आणि आता अंतिम त्यांच्यासोबत केली आहेत.






