वानवडीमध्ये लेफ्टनंट कर्नल महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : शहरातील वानवडी परिसरात लेफ्टनंट कर्नल असलेल्या महिलेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे.



रश्मी मिश्रा (वय ४३) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. कौटुंबिक वादातून आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात दिसून येत आहे. त्या जयपूर येथे आर्मी इंटेलिजन्समध्ये पोस्टिंगला आहेत.



पुण्यातील पुण्यात आर्मी ट्रेनिंग स्कूल मध्ये ६ महिन्याचे ट्रेनिंग घेण्यासाठी त्या आल्या होत्या. त्यातील ३ महिन्यांचे ट्रेनिंग पूर्ण झाले आहे. त्यांचे पती देखील कर्नल आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here