ठाणे (प्रतिनिधी सुभाष शांताराम जैन) : जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या व ठाणे शिवसेनेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या महारक्तदान शिबिरात आठ हजार बाटल्यांचे रक्तसंकलन करण्यात आले आहे.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज मैदान, तलाव पाळी समोर येथे सुरु असलेल्या या महारक्तदान शिबिरात आत्तापर्यंत (दिनांक १२ ऑक्टोबर २०२१पर्यंत) आठ हजार रक्त बाटल्या जमा झालेल्या आहेत. हा कार्यक्रम १४ ऑक्टोबर पर्यंत चालू राहणार आहे. या महारक्तदान शिबिरासाठी महाराष्ट्र राज्यातील विविध रक्तपेढी बँक सहकार्य करत आहेत.

या महारक्तदान शिबिरात संकलित झालेले रक्त ज्यांना रक्ताची आवश्यकता जरूरी आहे त्यांना देण्यात येणार असल्याची माहिती ठाण्याचे महापौर नरेश मस्के यांनी दिली. रक्तदात्यांचा पालक मंत्री एकनाथ शिंदे, महापौरांच्या आणि उपस्थित मान्यवरांचे हस्ते सत्कार आणि सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. या अनमोल कार्यासाठी ठाणे महानगरपालिका, पोलीस प्रशासन ,डॉक्टर ,नर्स, शिवसैनिक, कार्यकर्ते या सर्वांचे सहकार्य लाभत आहे.






