मध्यरात्री महिलेच्या घरात घुसून पोलिसाने केला बलात्कार

बाडनेर (राजस्थान) : एका पोलीस कॉन्स्टेबलने दलित महिलेच्या घरात घुसून बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. संबंधित पीडितेनं आरडाओरड केल्यानंतर कुटुंबातील इतर सदस्य आणि शेजारचे लोक जागे झाले. त्यांनी या पोलीस कॉन्स्टेबलला पकडून बेदम मारहाण केली. जखमी पोलीस कॉन्सटेबलला जिल्हा मुख्यालयातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. भारत-पाकिस्तान सीमेवरील बाडमेर जिल्ह्यात ही घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी कॉन्स्टेबल सुल्तान सिंह हा बाडमेर जिल्ह्यातील शिव पोलीस ठाण्यात तैनात आहेत. सोमवारी रात्री महिला घरात एकटी असल्याचे पाहून कॉन्स्टेबलने घरात प्रवेश केला होता. तेथे त्याने महिलेला मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यावेळी पीडितेने आरडाओरडा केल्यानंतर तिच्या कुटुंबातील इतरांना देखील जाग आली. त्यांनी घटनास्थळी पोलीस कॉन्स्टेबलला पकडून बेदम मारहाण केली. यामुळे कॉन्स्टेबल जखमी झाला. त्याला जखमी अवस्थेत बाडमेर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या प्रकरणाचा तपास उपअधीक्षक आनंद सिंह यांच्याकडे सोपवण्यात आलाय.

पोलीस अधीक्षक आनंद शर्मा म्हणाले की, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी जखमी कॉन्स्टेबलला बाडमेर जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पीडितेने कॉन्स्टेबल सुल्तान सिंह याच्यावर रात्री २ वाजता घरात घुसून तिच्यावर बलात्कार केल्याचा आणि तिला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here