घरगुती सिलिंडरचा काळाबाजार करणारा औरंगाबाद पोलिसांच्या ताब्यात

औरंगाबाद (जिल्हा प्रतिनिधी दत्तात्रय मोटे) : शहरात घरगुती गॅस सिलिंडरचा काळाबाजार करणाऱ्या एकाला पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले आहे.

मुकीम करिमोद्दीन अन्सारी (४२ रा. मोतीकारंजा) असे आरोपीचे नाव आहे. सोमवारी दुपारी मारलेल्या छाप्यात रेग्युलेटर, गॅस सिलिंडर, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा असा एक लाख तीन हजार दोनशे रुपयांचा ऐवज क्रांती चौक पोलिसांनी हस्तगत केला आहे.

याप्रकरणी पुरवठा तपासणी अधिकारी राजेंद्र शिंदे यांच्या तक्रारीवरून क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याची चौकशी करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here