ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) : येथील नौपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सोन साखळी चोरांनी धुमाकूळ घातलेला असतानाच नौपाडा पोलिसांचे पोलिसांच्या पथकाने उल्लेखनीय कामगिरी करत एकूण आठ गुन्हे उघड केले आहेत.
नौपाडा पोलीसांनी उघड केलेल्या आठ गुन्ह्यात पाच सोनसाखळी चोरीचे, दोन घरफोडी व एका बाईकचोरीचा गुन्हा आहे. या सर्व गुन्ह्यांमध्ये एकूण सात जणांना अटक केली असून हा सर्व मुद्देमाल जवळपास सहा लाखांचा असल्याचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी सांगितले.
शीळ डायघर परिसरात तीन घरफोडी व चोरीचे दोन असे एकूण पाच गुन्हे पोलिसांच्या पथकाने उघडकीस आणले आहेत. या गुन्ह्यांमध्ये टीव्ही मोबाईलसह एक लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.






