वडोली निळेश्वर येथे दसऱ्यानिमित्त पालखी सोहळा संपन्न

कराड (प्रतिनिधी राहुल पवार) : संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दसरा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो काही ठिकाणी दसरा उत्सवाला ऐतिहासिक परंपरा आहे काही ठिकाणी शस्त्रांचे पूजन केले जाते महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी श्रीरामाने रावणाचा वध केल्याचा आनंद उत्सव साजरा केला जातो.

ऐतिहासिक पार्श्‍वभूमी असणाऱ्या सातारा जिल्ह्यातील वडोली निळेश्वर चारी डोंगराच्या कुशीत वसलेले गाव या ठिकाणी शंभू महादेवाचे ऐतिहासिक स्थान आहे वडोलि निळेश्वर या गावांमध्ये ऐतिहासिक परंपरा आहे दसरा उत्सवा दिवशी मोठ्या प्रमाणात पालखी सोहळा व पेढेची यात्रा मोठ्या प्रमाणात भरली जाते ही परंपरा पूर्वीपासून आज आखेर या गावांमध्ये सुरू आहे.

या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात दसरा उत्सव साजरा केला जातो व मोठ्या प्रमाणात भक्तांची गर्दी असते दसरा उत्सवा दिवशी वर्षातून एकदा निळेश्वर सामाजिक फंड मोठ्या प्रमाणात जमा होतो त्या फंडातून गावातील धार्मिक कार्यक्रम होतात व यातून ऐतिहासिक संस्कृती जपली जाते ही परंपरा पूर्वीपासून सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here