दसऱ्याच्या मुहूर्तावर चितळे बंधूंच्या हस्ते पुण्यभूषण दिवाळी अंकाचे प्रकाशन

पुणे (उपसंपादक वासंती देवळे) : १५ ऑकटोबर रोजी दसऱ्याच्या मुहूर्तावर ‘पुण्यभूषण’ दिवाळी अंकाचे प्रकाशन पुण्यातील प्रसिद्ध मिठाईवाले चितळे बंधू यांच्या हस्ते सायंकाळी पावणे पाच वाजता डेक्कन जिमखाना येथील दुकानात अनोख्या वातावरणात झाले.

यावेळी पाहुणे म्हणून ज्येष्ठ उद्योजक कृष्णकुमार गोयल उपस्थित होते.पुण्याच्या इतिहास,वर्तमान आणि भविष्याचा वेध घेणाऱ्या पुण्यभूषण दिवाळी अंकाचे हे अकरावे वर्ष आहे.अनोख्या पद्धतीने प्रकाशन करण्याची परंपरा कायम ठेवत हा प्रकाशन समारंभ आयोजित केला होता.

डॉ सतीश देसाई,संस्थापक,पुण्यभूषण फाउंडेशन यांनी प्रास्ताविक केले. मकरंद टिल्लू यांनी सूत्रसंचालन केले. ‘पाहुण्यांचे स्वागत पुण्यभूषणचे उपरणे, दिवाळी अंक देऊन करण्यात आले. माधवराव चितळे ,संजय चितळे,केदार चितळे, श्रीकृष्ण चितळे, ज्येष्ठ उद्योजक कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते अंकाचे प्रकाशन करण्यात आले.

युनिक फीचरने हा अंक संपादित केला आहे. कृष्णकुमार गोयल, वृषाली दाभोलकर, संतोष धुमाळ, डॉ. दीपक बीडकर यांचा तसेच अंकाला मदत करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.डॉ. देसाई म्हणाले, ‘ पुण्यभूषण फाऊंडेशन, त्रिदलने पुण्यभूषण पुरस्कार, पहाट दिवाळी आणि पुणे शहराला वाहिलेला दिवाळी अंक पुण्यभूषण नावाने सुरु केला. सर्वोत्कृष्ट दिवाळी अंकाला एक लाखाचा पुरस्कार सुरू केला. एका शहराला वाहिलेला, पुण्यभूषण हा एकमेव दिवाळी अंक आहे. या वेळच्या अंकाच्या पहिल्या पानाचे मानकरी कृष्णकुमार गोयल हे आहेत.

केदार चितळे,संजय चितळे यांनी मनोगत व्यक्त केले. कृष्णकुमार गोयल म्हणाले, ‘ पुण्यभूषण, त्रिदल आणि डॉ. सतीश देसाई यांच्या संकल्पना अनोख्या असतात. सांस्कृतिक क्षेत्रात अतुलनीय योगदान त्यांनी दिले आहे. वृषाली दाभोळकर यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here